बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथील जयदुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवात स्त्री शक्ती सन्मान व्हावा यासाठी बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीसांना देवीची आरती करण्याचा मान देण्यात आला.
यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी स्वाती काजळे, सविता धुमाळ,रेश्मा काळे यांना मान देण्यात आला.यावेळी गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे आयोजन विकास देवकाते, संतोष लांडगे,सोमनाथ बिरदवडे,सचिन श्रीखंडे,श्याम लाड, बापूराव कदम,सागर शेलार,अनिल वाईकर,शैलेश थोरात यांनी केले होते.