VIRAL VIDEO : चक्क पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे उडून जाण्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुण्यात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाला बसला आहे. पाऊस आणि वारा एकत्र आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक महत्त्वाच्या कागदपत्राची फाईली या पावसात कार्यालयातून बाहेर फेकल्या गेल्या. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.पुणे शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळत आहे.

मात्र,या जोरदार आणि वादळी पावसामुळे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील सिलिंग फॅन कोसळला आहे. सिलिंग कोसळल्याने शासकीय गाड्यांचा मोठं नुकसान झालं आहे. अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सुदैवाने कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने मोठी हानी टळली आहे.आत्ता गेल्या अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या पाऊसाने शहरातील अनेक पेठांमध्ये रस्त्यांवर पाणी च पाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान,कालही पुणे शहरात दुपारच्या सत्रात तब्बल एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचलेला पाहायला मिळालं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *