मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पोलीस हवालदार यांना विभागीय अर्हता परीक्षाद्वारे पोलीस अधिकारी बनविण्याचे स्वप्न असते.त्यासाठी बंदोबस्त, १२ तास काम संभाळून ते रात्रीचा दिवस करुन अभ्यास करतात. परीक्षा पास होतात.पण,वेळेवर निर्णय न घेतल्याने त्यांची सेवा निवृत्तीची वेळ येते तरीही त्यांना बदोन्नती मिळत नाही.पण आता हा अडसर दूर झाला आहे.२०२०-२१ च्या निवड सूचीवरील पात्र अंमलदारांना स्थापापन्न २५ टक्के कोट्यातील रिक्त पदात पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार राज्यातील ४४ पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नतीने नियुक्त केले गेले आहे.तसा आदेश अखेर विशेष पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम यांनी काढला आहे.त्यामुळे राज्यातील ४४ पोलस अंमलदारांना अखेर पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई २६,चंद्रपूर १६, बुलढाणा आणि अमवती शहर मधील प्रत्येकी एक अशा ४४ पोलीस अंमलदारांना नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्न्तीने पदस्थापना करण्यात आली.
रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
झाल्यानंतर त्यांनी सर्व पोलीस अंमलदारांना निवृत्तीपूर्वी पोलीस अधिकारीपदी बढती मिळावी,असा विचार बोलून दाखविला होता. त्यानंतर शासनाने पोलीस हवालदारांना बढती देण्याचा निर्णय घेतला होता.दोन महिन्यांपूर्वी पुणे शहर पोलीस दलातील सेवानिवृत्त होणार्या पोलीस हवालदारांना त्यांच्या नोकरीच्या शेवटचा दिवशी पोलीस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली होती.