BIG BREAKING : पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ ; फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदाराकडे पैशाची मागणी केल्याने पोलीस हवालदार निलंबित..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपासात निष्काळजीपणा आणि तक्रारदार यांच्याकडे पैशांची मागणी केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुपीउद्दीन चमनशेख यांचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी निलंबन केले आहे.चमनशेख यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी (दि.२७) काढण्यात आले आहेत.शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये एका तक्रारदाराने २ लाख ७० हजार रुपयांची फसवणुक झाल्याबाबत तक्रारीअर्ज दाखल केला होता. हा तक्रारी अर्ज चौकशीसाठी पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख, यांचेकडे प्रभारी अधिकारी शिक्रापुर पोलीस ठाणे यांनी दिलेला होता,परंतु या तक्रारी अर्जावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अर्जदार यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली होती.

तसेच पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांनी पैशाची मागणी केली असल्याबाबत व्हिडीओ देखील दिला होता.पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांनी संबंधित अर्जाच्या चौकशी संदर्भात संशयास्पद वर्तन करुन आर्थिक फायदा मिळावा यासाठी अर्जाची चौकशी प्रलंबित ठेवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.तसेच अर्जदार यांना पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांनी पैशाची मागणी करुन शासकिय सेवकास अशोभनीय असे गैरवर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९७९ मधील नियम क्रमांक ३ चे उल्लंघन केले.तसेच शासकिय सेवेत दाखवलेल्या बेशिस्त,बेजबाबदार व पोलीस खात्याला अशोभनीय अश्या वर्तनाबद्दल चमनशेख यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली आहे.

पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख, यांना शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अधीन राहुन सेवेतुन निलंबित करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद केले आहे.अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे.त्यामुळे पुणे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे.निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.तसेच मुख्यालय सोडता येणार नाही.निलंबन कालावधीत पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण यांचेकडे नियमानुसार सकाळ व संध्याकाळी असे दिवसातून दोनवेळा हजेरी लावणे देखील बंधनकारक असणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *