ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल ? ट्रॅक्टर मालकांवर गुन्हा दाखल होणार का ?
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
माळेगाव पोलीस ठाण्यातील हद्दतीत असणाऱ्या शारदानगर परिसरातील कृषी विज्ञान केंद्र रोडवरील अवैधरित्या चोरीची वाळू वाहतूक करताना माळेगाव पोलिसांनी संशयित आरोपी स्वप्नील उर्फ बाबू बाळू भोसले वय.२५ वर्षे ( रा. निरावागज,ता.बारामती,जि.पुणे याच्यावर भा.द.वि.कलम ३८९ सह गौन खनिज कायदा कलम २१ (४) नुसार गुन्हा दाखल केला असून,या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळेगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार शारदानगर परिसरातील कृषी विज्ञान केंद्र रोड वरून अवैधरित्या चोरीची वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असता,पोलिसांनी त्याठिकाणी जात कृषी विज्ञान केंद्र रोडवरील चोरीची वाहतूक करणाऱ्या एकाला अर्जुन ५५५ या ट्रॅक्टरसह दोन ट्रॉल्या देखील पोलिसांनी ताब्यात घेल्या असून,या ट्रॉलीत अंदाजे दोन ब्रास वाळूचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.या गुन्ह्याचा आधीक तपास पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप हे करीत आहेत.
या कारवाईमध्ये केवळ ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर मालकावर देखील गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे. या घटनेत ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल या ट्रॅक्टर चालकाने व मालकाने कुठून आणला याचा तपास होणार का ? अशी चर्चा देखील लोकांमध्ये सुरू आहे. यामुळे आता माळेगाव पोलीस प्रशासन ट्रॅक्टर मालकांला देखील या गुन्ह्यात सहआरोपी करणार का ? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.