BIG BREAKING : पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार ! चिंचवड देवस्थान ट्रस्ट जमीन खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणी मोरगावच्या पोपट तावरेंसह,काही पोलीस अधिकाऱ्यांवर दौंड न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे जिल्ह्यातील चिंचवड देवस्थान ट्रस्ट जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणी पुण्याचे सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर,यवतचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,पोलीस उपनिरीक्षक पद्माराज गंपले आणि राष्ट्रवादीचा नेता पोपट तावरे यांच्यावर दौंड न्यायालयाने कलम ४२०, ४६४,१२० (ब) ,१९२,१९६ नुसार विविध गंभीर कलमनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार अष्टविनायकापैकी तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगाव येथे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे.यात खरेदी विक्री प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते पोपट तावरे यांनी फसववणूक केली असल्याबाबतची तक्रार तक्रारदार किरण शांताराम भोसले व आरती लव्हटे यांनी पोलिसांनाकडे केली होती.पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर राजकीय दबावामुळे यातील मुख्य आरोपी असलेल्या पोपट तावरे यास क्लीन चीट दिली होती.आणि या गुन्ह्यात त्यांचा सहभाग नाही असं न्यायालयास दर्शविले होते.परंतू पोपट तावरे हे खरेदीदार असताना ही हेतूपूर्वक त्याला बाजूला ठेवण्यासाठी संबंधित आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी खोटे कागदपत्र कोर्टात सादर केली असल्याने फिर्यादी यांनी न्यायालयात दाद मागितली होती.

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला अहवाल तक्रारदार यांना मान्य नसल्यामुळे त्या विरोधात तो ना मंजूर व्हावा याकरिता तक्रारदार यांनी अर्ज केला.तसेच प्रथमदर्शनी या तीनही आरोपींनी पुरावा असताना देखील आरोपी पोपट तावरे याला मदत करण्याकरता जाणून-बुजून खोटा अहवाल पाठवणे तसेच फिर्यादी यांची फसवणूक करणे त्यांच्या कर्तव्यात फौजदारी स्वरूपाची कर्तव्य कसूर करणे या व अशा कारणास्तव न्यायालयामध्ये तक्रारदार यांनी अ‍ॅड.राजेश काटोरे व अ‍ॅड.अमीत काटे यांचे मार्फत तक्रार दाखल केली होती.यावर दौंड येथील न्यायालयाने महत्वाची निरीक्षण नोंदवली असून पोलीसांनी पोपट तावरे यांना तीन गुन्ह्यातून निर्दोष सोडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच न्यायालयाने पोलिसांच्या कामावर ताशेरे ओढत उपायुक्त नारायण शिरगांवकर,पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले, राष्ट्रवादीचा नेता पोपट तावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान,याबाबत बारामतीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सध्या पुण्याच्या गुन्हे शाखेत सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले नारायण शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरचे प्रकरण यवत पोलीस स्टेशनचे आहे. त्या संदर्भात यवत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. यवत पोलीस स्टेशन माझ्या (बारामती उपविभाग पुणे ग्रामीण) अंतर्गत कधीच नव्हते तसेच यवत पोलीस स्टेशन ज्या विभागात आहे त्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे कधीच नव्हता.त्या प्रकरणाच्या तपासाचा माझा काहीही संबंध नाही.त्यामुळे या संदर्भात मी न्यायालयात अपील केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *