BHIGWAN CRIME NEWS : शेतीच्या वादातून महिलेस मारहाण करत केला विनयभंग; एकावर भिगवण पोलीस ठाण्यात मारहाणीसह विनयभंग व अनुसूचित जाती जमातीच्या कायद्यांन्व्ये गुन्हा दाखल..!!


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादलवाडी येथे शेतीच्या वादातून महिलेचा विनयभंग करत मारहाण करणाऱ्या एकावर भिगवण पोलीस ठाण्यात भा.द. वि.कलम ३२३,३२४,५०४,५०६, ३४ सह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक सुधारणा २०१५ चे कलम ३(१),(r),(s),३(२), (va) , ३ (१) (w) (i) (ii) ,३ (२) (va) नुसार विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग गुलाब कन्हेरकर ( रा.भादलवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या पतीने फिर्याद दिली आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी इंदापूर तालुक्यातील अकोले या ठिकाणी राहत असून, फिर्यादींची संशयित आरोपीच्या शेतीच्या शेजारी शेती असून,फिर्यादींची पत्नी शेतात गेली असता,शेतीच्या वादातून संशयित आरोपीने दमदाटी करून फिर्यादींच्या पत्नीचा विनयभंग करीत खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली असून, जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादींने फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास दौंड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *