PUNE CRIME NEWS : पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हॉटेल व ढाबा चालकांसह मद्यपींवर केलेल्या कारवाईत न्यायालयाने मद्यपींना ठोठावला दंड..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावाच्या हद्दीत हॉटेल चांदनी चायनीज येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात मद्याच्या बाटल्या व दारुच्या गुत्यावर विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्याने हॉटेल चालक अजित मनोहर पिंगट ( रा.बेल्हे,ता. जुन्नर ) यांच्यासह अवैधरित्या मद्य सेवन करणारे शहाजी मलका जाधव,अविनाश तुळशिराम केदारी,अक्षय सुरेश केदारी, महेश गोरख कसाल यांना ताब्यात घेण्यात आले असून, हॉटेल मालकांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम ६८ (अ),(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार,जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावात हॉटेल चांदणी चायनीज मध्ये अवैधरित्या विदेशी मद्य विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली असता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला असता,त्याठिकाणी अवैधरित्या विदेशी दारूची विक्री होताना व त्या हॉटेलमध्ये अवैधरित्या काहीजण मद्यप्राशन करताना आढळून आले.यात संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी व रक्ताची चाचणी शासकीय रुग्णालयात करण्यात आली.यामध्ये त्यांच्या ताब्यातुन दारुच्या गुत्यावर विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच रिकाम्या बाटल्या व मद्यपींसाठी किंवा ग्राहकांसाठी ठेवलेल्या टेबल खुर्च्या,ग्लास व इतर साहित्य असा एकूण १७,३८७ रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेण्यात आला.या गुन्ह्याचा तपास २४ तासात पुर्ण करुन आरोपींना न्यायलयात हजर केले असता,न्यायालयाने अवैध गुत्यामध्ये अवैधरित्या मद्य सेवन करतांना आढळून आलेल्या चारही मद्यपींना सिद्धपराधी ठरवून त्यांना द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.

ही कामगिरी मुंबईचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनिल चव्हाण,राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उप आयुक्त अनिल.बी.चासकर, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी.बी. राजपूत,उपअधीक्षक युवराज शिंदे ,उपअधीक्षक एस आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाचे निरीक्षक ए.बी.पवार,राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाचे दुय्यम निरीक्षक एस. एफ.ठेंगडे,दुय्यम निरीक्षक एम. एस.धोका,जवान सर्वश्री जयदास दाते,विजय विंचुरकर,संदिप सुर्वे, व जवान नि.वाहन चालक अंकुश कांबळे पथकाने केलेली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाचे निरीक्षक ए.बी.पवार हे करीत आहेत.

बातमी चौकट :

“नागरिकांना आहवान करण्यात येते की, कुठल्याही अवेध ढाब्यावर किंवा अवेध ठिकाणी दारु पितांना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. तसेच अवैध हॉटेल/ ढाबा मालक यांचेवर देखिल रितसर गुन्ह्या नोंद करून कडक कारवाई करण्यात येईल.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *