INDAPUR NEWS : कर्मयोगी कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न ; चालू हंगामात १५ लाख मे.टन ऊस गाळप करणार – हर्षवर्धन पाटील


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२२-२३ चा ३३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शारदोत्सवाच्या पहिल्या दिवशी कारखान्याचे ज्येष्ठ सभासद कुबेर आबा पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी कारखान्याच्या संचालिका शारदा कुबेर पवार या उभयतांचे शुभहस्ते विधीवत पूजा संपन्न होवून महाराष्ट‍्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धनजी पाटील यांचे शुभहस्ते व सर्व संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाला.कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये हंगाम २०२२-२३ चे पूर्वतयारीबाबत सर्व माहिती दिली.

यानंतर प्रमुख मार्गदर्शन करताना कारखान्याचे चेअरमन व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रथमत: घटस्थापनेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या वर्षी गाळप हंगामामध्ये आपणाकडे ३८ हजार एकर नोंदीचा व बिगरनोंद ५००० एकर असा एकूण ४१ हजार एकर उस गाळपाकरिता उपलब्ध होणार आहे यामधून अंदाजे १६ ते १७ लाख मेटन ऊस गाळपाकरिता उपलब्ध होणार आहे असे यावेळी सांगितले. कारखाना हा ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीचे शुभमुहूर्तावर चालू करणेचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे. त्या अनुषंगाने कारखान्यातील सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. मागील वर्षी कारखान्याने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ मध्ये एकूण २.७५ लाख मे.टन गाळप केले होते.

तसेच नियोजन यावर्षी कारखाना प्रत्येक महिन्यामध्ये करणार आहे. याकरिता लागणारी आवश्यक ती तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज केलेली आहे. यावर्षी कारखाना ज्यूस टू इथेनॉल हा पहिला प्रयोग करुन प्रतिदिन ७०० ते ८०० टन ज्यूस डिस्टीलरीकडे पाठविणार आहोत जेणकरुन या हंगामामध्ये ७५ ते ८० लाख लिटर व हंगाम समाप्तीनंतर बी हेवी ३० ते ३५ हजार मे.टन पासून असे एकूण १.२० ते १.२५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्याचे कारखान्याचे उदिदष्ठ आहे. या हंगामामध्ये कारखान्याचे उत्पन्न वाढविण्याकरिता बायप्रॉडक्टचे उत्पादन व गुणवत्तेमध्ये पूर्वीपेक्षा वाढ करुन सभासदांना जास्तीत जास्त दर देणेस आम्ही प्रयत्न करणार आहोत असेही यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.

  यावेळी बॉयलर असोसिएशन यांनी यावर्षी जवळजवळ १९७ साखर कारखान्यांचे बॉयलरचा परफॉर्मंस पाहून आपले कारखान्यातील टेक्स्मॅको या बॉयलरला बेस्ट बॉयलरचे तीस-या क्रमांकाचे बक्षिस मिळाल्याबद्रदल सर्व कर्मचारी व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.मागील वर्षी कारखान्याचे साखर उता-यानुसार २४५० रुपये प्र.मे.टन एफआरपी बसत असताना २५०० रुपये प्रतीटन भाव देण्याचे जाहिर केलेनुसार कारखाना लवकरंच उर्वरित दर लवकरच ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहे असेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

  या कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक मंडळ प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले.याप्रसंगी सत्यनारायणाची महापूजा संचालक मच्छिंद्र वीर व शालनताई वीर या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, जबीन जमादार, कार्यकारी संचालक राम पाटील, अधिकारी, हितचिंतक उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी सूत्रसंचालन तर सुधीर गेंगे-पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *