CRIME NEWS : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी ; वालचंदनगर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून तब्बल ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपींना ७२ तासांत घेतले ताब्यात ..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरी चोरीतील संशयित आरोपींना अवघ्या ७२ तासात ताब्यात घेण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून, गुन्ह्यातील तब्बल ३१ लाखांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला असून,याप्रकरणी संशयित आरोपी अमोल विलास होले, वय.२५ वर्षे ( रा.पारवडी,ता. बारामती,जि.पुणे ) सचिन राजाराम नाळे,वय.२३ वर्षे ( मूळ रा.थेरवडी,चिलारवस्ती,ता.कर्जत,जि.अहमदनगर ) सध्या रा.शिंदे हॉस्टेल,रूम नं.३ ,तांबेनगर, बारामती ) जयेश्वर जगन्नाथ मोरे, वय.३० वर्षे ( रा.पोहरेगाव,ता. रेणापूर,जि.लातूर ) यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट गाडीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता,त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले असून,दि. २१/९/२०२२ रोजी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील रोख रक्कम २८,०९,३०० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट गाडी अंदाजे ३,००,००० असा तब्बल ३१ लाख ०९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या तपासा दरम्यान त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दौंड पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील कुरकुंभ येथे बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली.पुढील तपासाकामी त्याची वैदकीय तपासणी करून वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक,डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधीकारी गणेश इंगळे यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके,वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,अमित सिद पाटील,मेठापल्ली प्रदीप चौधरी,सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे,रविराज कोकरे,तुषार पंदारे,पोलीस अंमलदार सचिन घाडगे,राजू मोमीन,जनार्दन शेळके,अभिजीत एकशिंगे स्वप्निल अहिवळे,अजय घुले, पोलीस कर्मचारी धीरज जाधव,
योगेश नागरगोजे,सहाय्यक फौजदार काशिनाथ राजापुरे, पोलीस कर्मचारी दगडु वीरकर यांच्या पथकाने केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *