CRIME NEWS : गावठी कट्टा बाळगणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात ; शहर पोलिसांच्या शोध पथकाची विशेष कामगिरी..!!


धुळे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

धुळे शहरातील नागरिकांना नवरात्र उत्सव निर्भयपणे साजरा करता यावा यासाठी पेट्रोलिंग करीत असताना गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयित आरोपी रविंद्र उर्फ राजु हनुमान वर्मा, वय.५३ वर्षे ( रा.सहजीवन नगर, शासकीय दूध डेअरी ) याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,धुळे शहरात नवरात्र व इतर सण उत्सव लोकांना निर्भयपणे साजरे करता यावे यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करण्याचे आदेश केले असता,धुळे शहर पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीदारमार्फत बातमी मिळाली की,एकजण सहजीवन नगर येथे गावठी कट्टा बाळगुन फिरत असल्याची माहिती मिळाली असता,पोलीसांनी तात्काळ सदर ठिकाणी जात पाहणी करत संशयित आरोपीला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता,त्याच्या कमरेला एक पिस्टल व पाच जिवंत काडतुस मिळून आली.यामध्ये २७५०० रुपये किमंतीचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला.या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस कर्मचारी भिकाजी पाटील हे करीत आहे.

ही कारवाई पोलीस धुळे पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक बी.जी.शेवाळे,शोध पथकाचे पोलीस अंमलदार भिकाजी पाटील, पोलीस नाईक कुदंन पटाईत,पोलीस कर्मचारी प्रविण पाटील, मनिष सोनगिरे,तुषार मोरे,अविनाश कराड,गुणवंतराव पाटील,शाकीर शेख यांच्या पथकाने केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *