BIG NEWS : राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बॉयलर २०२२ च्या स्पर्धेत बारामतीच्या श्रायबर डायनामिक्स डेअरीचा डंका ; पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाराष्ट्र राज्य बॉयलर संचालनय यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट बॉयलर पुरस्कार २०२२ बारामती एमआयडीसी मधील श्रायबर डायनामिक्स डेअरी प्रा.ली यांना प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.१४ ते १६ सप्टेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात सदर पुरस्कार देण्यात आला.बॉयलर वापरकर्त्यांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी तसेच जगभरातील भारतीय बॉयलर उत्पादन आणि अनुषंगिक उद्योगांना प्रक्षेपित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य,स्टीम बॉयलर संचालनयाचे संचालक धवल अंतापूरकर आणि सहाय्यक संचालक गजानन वानखेडे व त्यांचे सर्व अधिकारी यांनी २०२० पासून बॉयलर इंडिया प्रदर्शन आणि सर्वोत्कृष्ट बॉयलर पुरस्कार या सारखे उपक्रम आयोजित करत आहेत.त्याच अनुषंगाने सदर कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेसाठी सुरक्षितता,पर्यावरण, ऊर्जा संवर्धन,संचलन कार्यक्षमता कंडेन्सेट,रिकव्हरी,हाऊसकीपिंग, ५५, वैधानिक अनुपालन आणि देखभाल करण्याच्या पद्धतींबाबत स्पर्धा निकषांसह कंपनी आणि बॉयलर तपशील असलेला सहभाग फॉर्म या स्पर्धेसाठी मागविण्यात आला होता.बॉयलर ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स क्षेत्रातील ३० वर्षांचा अनुभव असलेल्या त्यांच्याद्वारे नियुक्त केलेल्य तज्ञांमार्फत ऑडिट करून निवड करण्यात आली.सदर कार्यक्रमासाठी विविध देशांतील विदेशी प्रतिनिधी उपस्थित होते भारतातील महाराष्ट्र राज्यातील एकूण १७५ स्पर्धकांनी विविध वर्गवारी मध्ये भाग घेतला.श्रायबर डायनामिक्स बारामती प्लांटने फार्मा,केमिकल डेअरी,हॉटेल्स फूड या श्रेणीतील ६८ स्पर्धकांना मागे टाकत “सर्वोत्तम बॉयलर” साठीचे प्रथम“सर्वोत्तम बॉयलर” साठीचे प्रथम पारितोषिक जिंकले.

२०२० आणि २०२२ मध्ये झालेल्या “सर्वोत्कृष्ट बॉयलर स्पर्धेत”बारामतीच्या श्रायबर डायनामिक्सचा हा सलग दुसरा विजय आहे.श्रायबर डायनामिक्स बारामती इंडिया प्लांटच्या सर्व कार्यांमध्ये उच्च दर्जा राखण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे.आणि आगामी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बॉयलर पुरस्कारासाठी नक्कीच हॅट्रिक करेल,असे श्रायबर डायनामिक्स इंडिया चे ऑपरेशन डायरेक्टर जितेंद्र जाधव यांनी मुंबईतील पुरस्कार सोहळ्यादरम्यान सांगितले.श्रायबर डायनामिक्स बारामतीचा ध्वज उंच आणि उंच ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकाग्रता, समर्पण,टीमवर्कच्या साहाय्याने श्रायबर डायनामिक्स बारामती,इंडियाला हे उल्लेखनीय यश मिळवून दिले,असे बारामतीचे प्लांट मॅनेजर हनुमंत जगताप यांनी सांगितले.

बारामती बॉयलर टीम,इतर सहाय्यक विभागांनी कठोर परिश्रम केले आणि बॉयलर ऑडिटच्या आधी आणि आवश्यक अनुपालनासाठी एकमेकांना बारामती बॉयलर टीम, इतर सहाय्यक विभागांनी कठोर परिश्रम केले आणि बॉयलर ऑडिटच्या आधी आणि दरम्यान आवश्यक अनुपालनासाठी एकमेकांना पाठिंबा दिला, ज्यामुळे हे उत्तुंग यश मिळवण्यात मदत झाली असे हेमंत चव्हाण टीम लीडर युटिलिटीज आणि मेंटेनन्स, बारामती यांनी नमूद केले.याप्रसंगी श्रायबर डायनामिक्स डेअरीजचे ऑपरेशन्स डायरेक्टर जितेंद्र जाधव,प्लांट मॅनेजर हनुमंत जगताप, व अधिकारी हेमंत चव्हाण,सुदेश कांबळे, दिलीप शिंदे उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *