BIG NEWS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अजित पवारांना मोठा धक्का ; बारामतीमधील साकार होणारा मोठा प्रकल्प जुन्नरला साकारण्याचा मोठा निर्णय..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत होणाऱ्या एका मोठ्या प्रकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.बिबट्या सफारी या प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जुन्नर तालुक्यातच करण्याचे आदेश दिले आहेत.बारामतीमध्ये साकार होणार असणारा बिबट्या सफारी प्रकल्प आता जुन्नर इथे साकारण्याचा निर्णय घेत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे. बारामती तालुक्यातील बिबट्या सफारी पार्क प्रस्ताव रद्द करून ही सफारी जुन्नर तालुक्यातील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून केली.

याआधी महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प बारामतीमध्ये साकारण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र,शिंदे सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा डाव हाणून पडला.वित्तमंत्री असलेल्या अजित पवारांनी बारामती बिबट्या सफारी या प्रकल्पासाठी बारामती तालुक्यात गाडीखेल येथील १०० हेक्टर जागेत ६० कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली होती.पर्यटनाला चालना देण्यासाठी या सफारीची योजना करण्यात आली आहे.हा प्रकल्प बारामतीकडे गेल्यावर शिंदे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आक्षेप घेतला होता.

‘जुन्नरचे आमदार-खासदार झोपेत आहेत,तुमच्या डोळ्यादेखत बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला गेला कसा’,अशा शब्दांत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी टीका केली होती. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसची थापेबाजी आणि बोगसगिरी उघडी पडत असल्याचंही त्यावेळी ते म्हणाले होते.आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द केले गेले आहेत. यातच आता शिंदे सरकारने हा प्रकल्प जुन्नरमध्येच साकारला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे,तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *