BIG CRIME NEWS : कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेल्या १६ गोवंशाची वालचंदनगर पोलिसांनी केली सुटका ; एकावर गुन्हा दाखल..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील लासुर्णे परिसरात कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेल्या व जनावरांची वाहतूक करणाऱ्या एकावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (a),११ (१) ,(f), ११ (१),(h),महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९५५ चे कलम ५ (अ),५ (ब),९ ,मोटार अधिनियम १९८८ चे कलम १७७,८३ नुसार विविध कलमान्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इम्रान निजाम कुरेशी ( रा. लासुर्णे,ता.इंदापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किसन सुरेश बेलदार (वय.४०) वर्षे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस कर्मचारी रात्री गस्त करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,लासुर्णे गावात राजवाडा परिसरात संशयित आरोपी इम्रान कुरेशी हा कत्तलीसाठी १४ गायींची लहान वासरे घेऊन आल्याची माहिती मिळाली असता,वालचंदनगर पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी जात पाहणी केली असता,त्याच्या मालकीचे वाहन असलेल्या छोटा हत्ती वाहन क्र.एम एच.४२.ए.क्यू.५४४९ यामध्ये दोन गाई तसेच त्याचे घरासमोरील परिसरात १४ गाईंची लहान वासरे मिळुन आली.

पोलिसांनी इम्रान कुरेशी याच्याकडे चौकशी केली असता, घरासमोरील परिसरात दोन गाई व १४ गाईची लहान वासरे असल्याचे सांगितले.ही जनावरे कोठून आणली ? त्याचा परवाना आहे का ? अशी विचारणा केली असता,संशयित आरोपीने उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यानंतर वाहनाची पाहणी केली असता वाहनात व घराच्या परिसरात १६ जनावरे भुकेने व्याकुळ होवुन अशक्त झालेली जखमी अवस्थेत असलेली निदर्शनास आली.या इसमाकडे जनावरे खरेदीच्या पावत्या व जनावरे वाहतुकीचा परवाना नसल्याने पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला.या गुन्ह्याचा अधिक तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *