भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यानंतर इंदापुर तालुक्यात सावकारीचे सर्वात जास्त पेव फुटले असून,भिगवण परिसरात देखील मोठ्या प्रमाणात सावकारी सुरू असल्याच्या चर्चा असून, यातील काही सावकार मस्तवाल सावकारांचा व्याजाच्या पैशावर नंगानाच सुरू असुन,अनेकजण या पैशाच्या त्रासापायी अनेकजणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असून,अशीच एक घटना इंदापूर तालुक्यातील घरगुती अडचणीसाठी १० टक्के व्याजाने घेतलेले पैसे फेडूनही तुझी जमीन मीच घेणार अशी भूमिका घेणाऱ्या डाळज नं. २ मधील खासगी सावकार संशयित आरोपी अभिजित सुदाम पानसरे ( रा.डाळज नं.२ ,ता.इंदापूर, जि. पुणे ) याच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ५०४, ५०६, महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी संजय भाऊसाहेब गिरमकर,वय.४६ वर्षे ( रा.डाळज नं.२,ता.इंदापूर,जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, की संशयित आरोपी खासगी सावकार अभिजित सुदाम पानसरे या सावकाराने संजय भाऊसाहेब गिरमकर यांना घरगुती अडचणीसाठी एक लाख रुपये १० टक्के व्याजाने दिले होते.यावेळी सावकाराने गिरमकर यांची भादलवाडी येथील गट नं. २२ मधील झिरो चाळीस आर जमीन क्षेत्राची विसार पावती करून घेतली होती.दरम्यान गिरमकर यांनी पानसरे यांचे मुद्दल व व्याजासह १ लाख १० हजार परत केले व नोटरी केलेल्या जमिनीचा दस्त परत मागितला असता सावकार पानसरे याने गिरमकर यांना मी तुझी जमीन घेणार आहे असे म्हणत त्यांना व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे गिरमकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.ही घटना जून २०२२ ते २७ ऑगस्ट दरम्यान घडली आहे.