BIG NEWS :इंदापुरमध्ये दत्तात्रय भरणे यांना धक्का ; पंचायत समितीचे मा.उपसभापती बोराटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत केला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

इंदापुर अर्बन बँक येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये इंदापूर पंचायत समितीचे मा.उपसभापती कांतीलाल बोराटे यांनी आपल्या असंख्य सहकार्यां Mसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कांतीलाल बोराटे व त्यांच्य सहकाऱ्यांचे उस्फुर्त स्वागत केले.हर्षवर्धन पाटील म्हणाले की,तालुका लोकप्रतिनिधींनी केवळ खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे.

या खोट्या आश्वासनांना जनता बळी पडली होती. सध्याचे सरकार हे जनतेचे सरकार असून कांतीलाल बोराटे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनतेचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्ते , पदाधिकारी तालुका लोकप्रतिनिधीवर नाराज असून आगामी काळात ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.’
यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराम जाधव , निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलास वाघमोडे पै. पिंटू काळे व पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *