BARAMATI NEWS : बारामतीत एमआयडीसी परिसरातील लाॅजवर वेश्या व्यवसायाविरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई ; तिघांविरोधात गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती एमआयडीसी परिसरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोरील बाजूस असणाऱ्या हॉटेल राजलक्ष्मी लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला असून, याप्रकरणी संशयित आरोपी किरण बापू पाटील ( रा.हाजी मलंग रोड,एकविरा देवी पिसवली ता.भिवंडी,ठाणे ),युवराज लोखंडे ( पूर्ण नाव माहीत नाही ),विठ्ठल चव्हाण सध्या ( रा.राजलक्ष्मी लॉज,बारामती ) यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,६,७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी शिवदास काटकर यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,बारामती औद्योगिक विभागामध्ये आरटीओ कार्यालयाच्या समोरील राजलक्ष्मी लॉजमध्ये अवैद्य वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच,बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या विशेष पथकाने अचानकपणे राजलक्ष्मी लॉजवरती छापा टाकला असता व्यवस्थापक किरण पाटील याला ताब्यात घेतले. एका खोलीतून दोन महिलांची सुटका केली.त्यातील एक महिला ओडिसा तर दुसरी आसाम राज्यातील आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल जप्त केले. पाटील यांच्याकडील चौकशीत युवराज लोखंडे व विठ्ठल चव्हाण यांच्या सांगण्यावरून हा व्यवसाय येथे केला जात असल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पाटील याला अटक करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *