पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाणेकरवाडीत गोकुळ सोसायटीमध्ये सुरू असलेल्या बनावट मद्य निर्मिती व विक्री करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत २,१०,८९० मुद्देमाल हस्तगत केला असून, याप्रकरणी हरिष ब्रिजेश कुमार,वय.२४ वर्षे ( रा. नाणेकरवाडी,चाकण,ता.खेडजि.पुणे ) राघवेंद्र यशवीर सिंह, वय.२० वर्षे ( रा.नाणेकरवाडी, चाकण,ता.खेड,जि. पुणे ) यांच्यासह वाहिद साजिद शेख व त्याच्याकडून माल विकत घेणारा राममुरत बिंद यांना ताब्यात घेतले असून,त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ब),(ड),(क),(ई),८१,८३, १०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुक्लने दिलेली सविस्तर माहिती अशी की,राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार खेड तालुक्यातील नाणेकरवाडी गोकूळ सोसायटीमध्ये बनावट देशी मदय निर्मिती व विक्री करणारा कारखाना असल्याची माहिती मिळाली असता, तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ कारखान्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी देशी दारु टँगो पंच १८० मिलीचे ०७ बॉक्स, देशी दारु टँगो पंच, ९० मिलीचे ३ बॉक्स,मॅकडॉल्स नं.१ व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ५४ बाटल्या मिळून आल्या. तसेच, देशी दारु टँगो पंच १८० मिली क्षमतेच्या रिकाम्या २५० बाटल्या, देशी टँगो पंच ९० मिलीच्या ५०० बाटल्या, पाणी मिश्रीत मदयाची तोटी असलेली एक स्टीलची टाकी त्यामध्ये अंदाजे ७ लीटर बनावट मदय मिळून आले.
बनावट मदयाची निर्मिती करताना हेअर ड्रायर व दाभनाचा उपयोग करत होते.बनावट मद्यार्क हे बाटल्यामध्ये भरुन ते सिल करून त्याची विक्री सुरू होती.यावेळी संशयित आरोपीला ताब्यात घेत मुददेमाल ताब्यात घेवून अधिक तपास केला असता वाहीद साजीद शेख यांच्या ताब्यातील पत्रा शेडमध्ये देशी दारु टँगो पंच १८० मिलीचे २५ बॉक्स,देशी दारु टँगो पंच ९० मिलीचे २ बॉक्स असे एकून २७ बॉक्स मिळून आले.यात संशयित आरोपी नामे वाहीद शेख यास ताब्यात घेवून अधीक तपास केला असता, संशयित आरोपीने बनावट मदय सुनिल राममूरत बिंद याला विकले असल्याचे सांगितले. या इसमांस नानेकरवाडी येथून ताब्यात घेण्यात आले असून,त्याच्या ताब्यातील मुददेमालासह अटक करुन ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत २,१०,८९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.संशयित आरोपींना मा.न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईमध्ये निरीक्षक सुनिल परळे,डी.सी. जानराव, दुय्यम निरीक्षक एस.टी.भरणे,डी.बी.सुपे,एन.आर.मुजाळ ए.पी.बडदे,सह.दु.नि.रवि लोखंडे,स्वप्निल दरेकर, डी.बी. गवारी व जवान सर्वश्री रसुल काद्री,शिवाजी गळवे,राहूल जौजाळ,रावसाहेब देवतुळे,गायकवाड,अतुल बारंगुळे, सोलंके,समीर पडवळ सहभागी झाले.या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क बीट क्र.१ दुय्यम निरीक्षक
एस.टी.भरणे या करीत आहेत.