POLITICAL NEWS : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर सुप्रिया सुळे ह्या वरमाई सारख्या वावरत होत्या ; आमदार गोपीचंद पडळकरांची टीका..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर आले असता, बारामती शहरातील मुक्ताई लॉन्स या ठिकाणी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी पडळकर यांनी शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात टिकेची झोड उठवली.बारामतीला सतत तुम्ही बालेकिल्ला का म्हणता ? असा सवाल करत ही तर टेकडी आहे, ही टेकडी फोडण्याचे काम मी दोन वर्षापासून करतोय, २०२४ ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत आले असून,आगामी निवडणुकीत श्रीलंकेच्या अध्यक्षांप्रमाणे शरद पवारांना देखील बारामतीतून पळावे लागेल,अशी विखारी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

यावेळी पडळकर म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या वावरत होत्या. देवेंद्र फडणवीस यांना सत्ता मिळू न देण्यासाठी पवारांनी मोठे षडयंत्र केले.मात्र तरी देखील ते सत्तेत आले, याचे फार मोठे दुःख शरद पवारांना आहे. २०२४ मध्ये शरद पवार यांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत आले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. त्यामुळे बारामतीचे कधी ऑपरेशन होईल, हे देखील पवारांना कळणार नाही. भारत- पाकिस्तान सामना जिंकल्यानंतर शरद पवार हात वर करतात. आता आरती करतानाचे व्हिडिओ त्यांना टाकावे लागतात, हेच भाजपचे यश आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडली, परंतु बावनकुळे ऊर्जामंत्री असताना शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. मराठा ओबीसी आरक्षण आघाडी सरकारला देता आले नाही, परंतु फडणवीस सरकार आल्यानंतर मिळाले,असे पडळकर यांनी यावेळी सांगितले.

मागील विधानसभा निवडणुकीवेळी मी बारामतीतून उभा होतो,त्यावेळी माझे डीपॉझिट जप्त झाले.आज मेळाव्याला मोठी गर्दी आहेत, ही माणसे त्यावेळी कुठे गेली होती, असा उद्विग्न सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी पडळकर यांनी शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात टिकेची झोड उठवली. यावेळी बावनकुळे यांच्यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपचे प्रभारी राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, गणेश भेगडे, अविनाश मोटे, दिलीप खैरे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *