BIG BREAKING : बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का ; लोकसभा मतदार संघातील एक हजार युवकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये होणार प्रवेश..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भाजपचे मिशन बारामती सध्या महाराष्ट्रात चर्चेत असून बारामती लोकसभा मतदार संघ भाजप ने लक्ष केला असून उद्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बारामती,इंदापूर, दौंड, पुरंदर येथील जवळपास एक हजार युवकांचा भाजप मध्ये प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याबाबत सर्व तयारी झाली आहे.देशात भाजपचे ४०० हुन अधिक खासदार निवडून आणण्याचे लक्ष भाजप च्या वरिष्ठ कार्यकारिणीने ठेवले असून ज्या ठिकाणी दोन हजार एकोणीस मध्ये भाजप दुसऱ्या स्थानावर होते त्या ठिकाणी भाजप पूर्ण ताकतीने लढणार आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर मतदार संघाचा समावेश आहे.बारामती लोकसभा मतदार संघ हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो.गेली पन्नास वर्ष पवार गटाची बारामतीवर सत्ता आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा गड उद्वस्त करण्याचा चंग बांधला असून उद्याचा तरुणाचा होणारा प्रवेश हा मतदानवर परिणामकारक ठरणार असल्याचे भाजप च्या गोटातून बोलले जातं आहे.

अनेक संघटना, कला क्रीडा क्षेत्रातील तरुणाई भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त असल्याने पवार गटाला ही बातमी धडकी भरवणारी असल्याचे मानले जाते.दरम्यान या प्रवेशाबद्दल अंत्यत गुप्तता पाळण्यात आली असून राष्ट्रवादी गोटात याची तुसभर सुद्धा माहिती नाही.त्यामुळेच भाजप च्या वरिष्ठ पातळीवरून या प्रवेशाची सूत्र फिरवली गेली असून या पक्ष प्रवेशाचा सूत्रधार कोण आहे हे उद्या कार्यक्रम झाल्यावरच समजेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *