इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेल्या २४ जनावरांना गोरक्षकांनी इंदापूर पोलिसांच्या मदतीने जीवनदान दिले असून याप्रकरणी अज्ञात इसमावर इंदापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम ९ , ५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मुथाप्पा यल्लाप्पा संकुल यांनी फिर्याद दिली आहे.सदरील गोवंश पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेत सुखरूप सोडण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,इंदापूर पोलिसांना गोरक्षकांच्या मार्फत गोपनीय माहिती मिळाली की, इंदापुर येथील कुरेशी गल्ली येथे काटेरी झुडपामध्ये अज्ञात इसमाने जनावरे ही कतलीचे उद्देशाने बांधून ठेवली आहेत.अशी बातमी मिळाल्यानंतर, इंदापूर पोलिसांनी तात्काळ जात त्याठिकाणी पाहणी केली असता,तेथे कत्तलीच्या उद्देशाने देशी खिलार जातीच्या १० गाई,लाल कंदारी जातीच्या ४ गाई, जरशी जातीच्या ७ गाई व लहान ३ वासरे अशी २४ जनावरे कत्तल करण्याच्या हेतूने त्यांना कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची सोय न करता बांधुन ठेवलेली मिळुन आली.या जरश्या १० गायीची किंमत अंदाजे ७०,०००,मोठ्या जरश्या ७ गायींची किंमत अंदाजे १,००,०००,लाल कंदारी जातीच्या ४ गायींची अंदाजे ४०,०००,तीन लहान वासरांची अंदाजे किंमत ६००० असा एकूण २,१६,००० किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.या कारवाईसाठी गोरक्षक अक्षय कांचन व हृषीकेश कामठे यांनी मोलाचे सहकार्य केले.
बातमी चौकट :
पुणे गोरक्ष दलाकडून पोलिसांना एक नम्रतेची विनंती आहे की आम्ही आजपर्यंत पाच ते सहा वेळा रेड करून सुद्धा इंदापूर येथील कत्तलखाना सुरूच आहे तरी पोलिसांनी कत्तल खाण्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व तातडीने हे सगळे कत्तलखाने उद्ध्वस्त करून टाकावे.
अक्षय कांचन ( गोरक्षक )