बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीसह परिसरातील व्यावसायिकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून गुन्हेगार मित्रांच्या मदतीने अनेकांना लुबाडणार्या तरुणींचा बारामतीत सुळसुळाट झाला असल्याची बातमी प्रसिद्ध होताच या झारीतल्या शुक्राचार्याला पुरतीच मिरची झोबंल्याचे दिसत असून,ही बातमी लावल्याने या हनी ट्रॅप प्रकरणात पैसेरुपी खंडणी उकळण्याचा डाव उधळला असल्याने या झारीतल्या शुक्राचार्याने संबंधित अधिकाऱ्याला सोबत घेत बातमी लावल्याचा राग मनात धरून पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी केल्याची चर्चा देखील सुरू आहे.
या टोळीला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्याची अनेक प्रकरणे असून,या सगळ्या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री, गृहमंत्री,राज्याचे विरोधी पक्षनेते व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणार असून,लवकरच काही सामाजिक संघटना देखील या प्रकरणात गृहमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्याशी संपर्क करणार असून,या अधिकाऱ्याच्या काळ्या कारनाम्याची माहिती देणार आहेत.तसेच या अधिकाऱ्याच्या कॉलचे CDR रिपोर्ट देखील काढण्याची मागणी करणार असून, यामध्ये अजून कोणा कोणाचा सहभाग आहे हे देखील निष्पन्न होईल.
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे बारामती गुन्हेगारीमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात, मात्र बारामतीत काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे प्रकार देखील समोर येत आहेत.यामुळे अशा अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणार असून,जर पोलीस प्रशासनाने याची दखल वेळेवर घेतली नाही तर,तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी उपोषणाला देखील बसणार आहेत.
( या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करून याबाबत सविस्तर मालिका प्रसिध्द करणार…) इथे लोकशाही आहे हुकूमशाही नाही.