PUNE NEWS : संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांचा वाढदिवस अनाथ व एचआयव्ही ग्रस्त मुलांना खाऊ वाटप व विविध उपक्रमांनी साजरा..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झाली. आजपर्यंत संभाजी ब्रिगेड शंभर टक्के समाजकारण आणि शंभर टक्के राजकारण करत आली होती. मात्र संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी शिवसेनेसोबत युती करून कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचे काम केले. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे शहरात युतीचा आनंद उत्सव साजरा करत असताना कात्रज येथील ममता फाउंडेशन मधील अनाथ व एचआयव्ही ग्रस्त मुलांना फळ वाटप करण्यात आले. तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीने ‘सभासद नोंदणी अभियान’ आज पासून पुणे शहरातील सर्व भागांमध्ये राबवण्यात येणार आहे… असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराचे अध्यक्ष व संयोजक अविनाश मोहिते यांनी व्यक्त केले.

आरोग्यम् धनसंपदा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संभाजी ब्रिगेडच्या वतीने आखरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य कार्ड (तीस लाखापर्यंत आरोग्य सुरक्षा विमा योजना) राबवण्यात येणार आहे.३०० रुपयात सर्व नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी यांचा सुरक्षित विमा या माध्यमातून काढण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांच्या सुरक्षितेचे हित लक्षात घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सुमारे १००० कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड नाव नोंदणी केली. तसेच आज संभाजी ब्रिगेड वाहतूक आघाडीच्या शाखेची स्थापना करण्यात आली.

ममता फाउंडेशन, कात्रज येथे फळ वाटप करताना…

यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, पर्वती विभाग अध्यक्ष अविनाश घोडके, सचिव संदीप कारेकर, पर्वती विधानसभा अध्यक्ष कुमार पवार, सरचिटणीस संघटक नरेश पडवळ, महादेव मातेरे, व्येकंटशभाऊ मानंपिडी, समाधान घोडके, रंजीत लंगर, वैभव घोडके, प्रमोद धुमाळ आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *