बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीसह परिसरातील व्यावसायिकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून गुन्हेगार मित्रांच्या मदतीने अनेकांना लुबाडणार्या तरुणींचा बारामतीत सुळसुळाट झाला असून,या सगळ्या घटनेचा पोलीस प्रशासन गांभीर्याने विचार करणार का ? तसेच या टोळीतील तरुणी ही फेकबुक आणि इन्स्टाग्रामच्या सारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यावसायिकासोबत ओळख निर्माण करते आणि त्यातूनच मैत्री करत त्यांना जाळ्यात खेचले जाते.आणि मग त्यांना हॉटेलला बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. आणि मग हनी ट्रॅपच्या नावाखाली त्या व्यावसायिकाकडे २५ ते ३० लाखांच्या खंडणीची मागणी केली जाते.अशी चर्चा देखील बारामती एमआयडीसी परिसरात जोरदार सुरू आहे.
या टोळीतील तरुणी ही सोशल मीडियाचा वापर करण्यात पटाईत आहे.काही खासगी सावकार व गुन्हेगार मित्राच्या मदतीने हा हनी ट्रॅपचा सापळा लावला जात असून,यात अनेक व्यावसायिकांना अब्रु जाण्याच्या भितीने ही टोळी मागेल तितके पैसे देऊन आपली सुटका करुन घेतली जाते.अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे. या टोळीने अनेकांना अशाप्रकारे लुबाडले असल्याची देखील चर्चा सुरू आहे.अनेकजण भीतीपोटी किंवा अब्रूला घाबरून तक्रार देण्यास धजावत असल्याने ते तक्रार देण्यासही पुढे आलेले दिसत नाही.आणि या सगळ्या प्रकारात एका पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश असल्याच्या चर्चा सुरू आहेत.त्यामुळे या सगळ्या प्रकाराची पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख चौकशी करणार का ? या सगळ्या प्रकारात या टोळीला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून,कारवाई करणार का ? हे पाहणं औतुक्यांच ठरणार का ?
याअगोदरही बारामती तालुक्यात अशी हनी ट्रपचे प्रकार घडले असून,आता तरी हे प्रकार थांबणार का ? राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे बारामती गुन्हेगारीमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात,मात्र बारामतीत काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे असे प्रकार घडत असून,लवकरच काही सामाजिक संघटना या घटनेविषयी विरोधीपक्ष नेते अजित पवारांची भेट घेत हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालणार असल्याची माहिती मिळत आहेत.आणि हनी ट्रॅप प्रकरणात मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची गृहमंत्र्यांकडे देखील तक्रार करणार असल्याची माहिती मिळत आहे.