बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती मधील अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असताना,कारवाई करण्यासाठी आलेल्या गाव कामगार तलाठी यांना वाळू माफियांकडून धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बारामती तालुक्यात अवैधरित्या वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असून महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही तस्करी सुरू असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. वारंवार तक्रारी अर्ज करून देखील महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. आणि याचाच परिणाम म्हणून वाळू माफियांची मजुरी वाढत चालली आहे. आणि परिणामी अशा घटना घडत आहेत. पोलीस प्रशासनाला देखील या संबंधित माहिती असून देखील त्यांच्याकडून देखील आर्थिक हितसंबंधांमुळे कारवाई केली जात नाही अशी देखील बारामतीत चर्चा सुरू आहे.
याबाबत गाव कामगार तलाठी यांना धक्काबुक्की प्रकरणी फलटण तालुक्यातील वाळूमाफिया दिलीप बोराटे, हृषीकेश दिगंबर सोडमिसे,गणेश सोडमिसे ( रा.सोमंथळी,ता. फलटण ) यांच्यासह एका अनोळखी इसमावर वाळू चोरीचा ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.द. वि. कलम ३५३,३८९, खाण आणि खनिज ( नियमन आणि विकास ) अधिनियम १९५७ चे कलम ४,५ , महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तलाठी प्रल्हाद भिमाजी वाळूंज, वय.४३ वर्षे सध्या ( रा.माळेगाव बुद्रुक, ता. बारामती ) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी याबाबत सविस्तर माहिती अशी की,३० ऑगस्ट रोजी फिर्यादी सांगलीवरून बारामतीकडे येत असताना शिरवली गावच्या हद्दीत फलटण बारामती रोड वरून बारामतीकडे एक ट्रॅक्टर वाळू भरून बारामतीच्या दिशेने जाताना दिसला फिर्यादीने ट्रॅक्टर आडवत ही बाब मंडल अधिकारी रवींद्र पारधी यांना कळवली. यावेळी ट्रॅक्टर चालकाने आपले नाव दिलीप बोराटे असे सांगितले. त्याच्यासोबत एक अनोळखी तिचा बसला होता त्यावेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून बुलेट गाडी क्र.MH.11.CD.313 या गाडी वरून हृषीकेश सोडमिसे व गणेश सोडमिसे आले.त्यांनी फिर्यादी तलाठी वाळुंज यांना तुम्ही ट्रॅक्टर का अडवला ? याबाबत विचारणा करीत असताना ट्रॅक्टर चालक बोराटे यांनी ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न केला फिर्यादींनी त्याचा पाठलाग करत ट्रॅक्टर पुढे आपले वाहन लावले.यावेळी संशयित आरोपी ऋषिकेश याने फिर्यादींना धक्काबुक्की केली आणि त्याचवेळी ट्रॅक्टर पळून फलटण दिशेने देण्यात आला. आणि त्यानंतर ऋषिकेश व गणेश हे दोघे बुलेटवरून तेथून निघून जात शासकीय कामात अडथळा आणला असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे हे करीत आहेत.