पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
अहमदनगर रोडने पुण्याकडे गोमांसची वाहतूक करणाऱ्या तीन चारचाकी वाहनांना पोलिसांनी पोलिसांनी पकडले आहे.या चार वाहनांमधील तब्बल ६००० किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले,असून तीने चारचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून, याप्रकरणी मुजीब मारुब पठाण,वय.३२ वर्षे ( रा.कोटला, घासगल्ली,अहमदनगर ),सय्यद परवेज अख्तर,वय.३० वर्षे ( रा. कसाईगल्ली,अहमदनगर ), रहमुद्दीन मेहबूब कुरेशी,वय.२९ वर्षे ( रा.माजलगाव,ता.बीड ) यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ४२९,३४ पशु संरक्षण अधिनियम १९५१ चे कलम ५ ,पशु संरक्षण अधिनियम १९४८ चे कलम ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अखिल भारतीय गोसेवा संघाचे सदस्य व महाराष्ट्र मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी,वय.२७ वर्षे ( रा.दाताडे बंगला, आनंदनगर सिंहगड पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, महाराष्ट्रशासन मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना गोपनीय बातमी दारामार्फत माहितीमिळाली की,अहमदनगर कडुन पुण्याकडे पांढऱ्या रंगाच्या तीन टेम्पो मध्ये गायी व बैल कापून त्यांच्या मासांची विक्री पुण्यातील शिवाजी मार्केट येथे केली जाणार असल्याची माहिती मिळाली असता,ही माहिती त्यांनी शिक्रापूर पोलिसांना दिली.पोलिसांसह पाबळ चौक येथे येऊन थांबले असता,पहाटे ५.१५ च्या सुमारास अशोक लेलंड टेम्पो नं.एम.एच.१६.से.वाय ६२८०,व एक पांढऱ्या रंगाचा मारूती करी माल वाहतुक गाडी क्र.एम.एच.१४.एच.यु.१८४१ व एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पीक अप क्र.एम.एच.१४.ए.झेड. ४२५१ या गाड्या नगरकडून पुण्याकडे येताना दिसल्या.
यावेळी तिन्ही गाड्या थांबवून पाहणी केली असता,तिन्ही टेम्पो मध्ये जनावरांचेे मांस आढळून आले.याबाबत वाहन चालकांना विचारणा केली असता,त्यांनी गाय व बैलाचे मांस असल्याचे सांगुन ते अहमदनगर येथुन पुण्यात शिवाजी मार्केट येथे घेवुन जात असल्याचे सांगीतले. यामध्ये पोलिसांनी तिन्ही वाहनांत मिळून तब्बल ६००० किलो गोमांस व गाड्या असा एकूण १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार लांडगे हे करीत आहेत.
बातमी चौकट :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की,छत्रपती शिवाजी मार्केट पुणे कॅम्पमध्ये गायीच मांसच काय गायीच शेपूट देखील येऊ देणार नाही.
शिवशंकर स्वामी ( महाराष्ट्र शासन मानद पशुकल्याण अधिकारी )