पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा खंडणी विरोधी पथक एकने पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पाच जणांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संमवाडी येथे करण्यात आलेल्या या कारवाईत १७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी करण्यात आली.टेम्पो चालक संतोषकुमार जयहिंद मोरे (रा.दिघी पद्मावती फाऊंडेशन खडकी चे मालक प्रेमचंद जैन, संतोषी रुपचंद सोलंकी,प्रकाश रुपचंद सोलंकी,प्रमोद रुपचंद सोलंकी (रा.पाटील इस्टेट, शिवाजीनगर,पुणे) यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात अत्याआवश्यक वस्तु कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की,एका पांढऱ्या रंगाच्या टेम्पो (MH.14.Y.2320) मधील सरकारी रेशनिंगचा तांदुळ संगमवाडी येथे एका पत्रा शेडच्या गोडाऊन मध्ये खाली करुन तो पॉलिथीनच्या बॅगमध्ये भरुन तो छुप्या पद्धतीने खुल्या बाजारात बेकायदेशीर विक्रीसाठी साठवण्यात आला आहे. तसेच हा तांदूळ टेम्पोतून संध्याकाळी संमवाडी येथील गोदामात घेऊन जाणार आहेत.मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने संगमवाडी येथील गोडाऊनवर छापा टाकला असता, त्या ठिकाणी रेशनिंगच्या तांदळाच्या पोत्यांनी भरलेला टेम्पो आढळून आला.
पोलिसांनी टेम्पो चालक संतोषकुमार मोरे याच्याकडे चौकशी केली असता रेशनिंगचा तांदूळ पद्मावती फाऊंडेशनचे मालक प्रेमचंद जैन यांच्या सांगण्यावरुन संतोषी सोलंकी, प्रकाश सोलंकी, प्रमोद सोलंकी यांच्या संमवाडी येथील गोडाऊनमध्ये घेऊन आल्याचे सांगितले. पोलिसांनी टेम्पोमधील अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला १५२ क्विंटल तांदुळ जप्त केला.तसेच गोडाऊनची तपासणी केली असता त्यामध्ये काळ्या बाजारासाठी साठवून ठेवलेला १६० क्विंटल तांदुळ आणि ५७.५ क्विंटल गहु व इतर मुद्देमाल असा एकूण १७ लाख ४१ हजार ३६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील,पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव,
अंमलदार प्रमोद सोनावणे, सयाजी चव्हाण,नितीन कांबळे,किरण ठवरे,दुर्योधन गुरव,अमोल आवाड,विजय कांबळे,राजेंद्र लांडगे यांच्या पथकाने केलेली आहे.