मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गेल्या पन्नास वर्षापासून राजकारणात ज्या कुटुंबाची नावे अग्रक्रमाने घेतले जातात,अशा कुटुंबामध्ये पवार कुटुंबीयांचे नाव घेतले जाते आणि आता याच पवार कुटुंबातील शरद पवारांचे नातू कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार नातू रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे.ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत २००६ ते २०१२ पर्यंत रोहित पवार हे या कंपनीचे संचालक होते.तसेच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील २००६ ते २००९ पर्यंत या ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते.
त्याचबरोबर या कंपनीत असणारे इतर सर्व सदस्य हे सध्या तुरुंगात असलेल्या एचडीआयएल कंपनीचे मालक राकेश वाधवान यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर देखील आहेत आणि याचदृष्टीनं ईडीचा तपास सुरू आहे. यामध्ये बाबासाहेब सुर्यवंशी लखमिंदर सिंग,धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे.ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडले. त्यानंतर हळूहळू इतर चार सदस्य देखील त्या कंपनीतून बाहेर पडले. त्यामुळे आता ईडीने या संपूर्ण प्रकरणात रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्या सोबतचे संबंध पाहता प्राथमिक तपासला सुरुवात केली आहे.
याबाबत बारामतीत सृजन भजन स्पर्धेवेळी रोहित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला असता,रोहित पवार म्हणाले आहेत की, ”जे सांगण्यात आलं आहे, ते कुणी सांगितलं ? याबाबत काय कागदपत्रे आहेत,हे मी पाहिलेलं नाही.आणि हे मला बघावं लागेल आणि त्यानंतरच मी यावर बोलेल.यावेळी रोहित पवार म्हणाले की गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेकवेळा केंद्रीय यंत्रणांनी मला व माझ्या अधिकाऱ्यांना बोलावलं आहे.त्यावेळी जसं सहकार्य केलं,तसेच मी यावेळी ही करेन.”अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.