BIG NEWS : भिगवण करांची पाणी समस्या सुटणार; भिगवणसाठी २९ कोटी ७५ लाख खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेस राज्य शासनाची मंजूरी..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भिगवण शहर व परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २९ कोटी ७५ लाख खर्चाच्या नळ पाणीपुरवठा योजनेस राज्य सरकारने सोमवार (दि.२२) ऑगस्ट रोजी मंजुरी दिली आहे. अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.राज्यात नव्याने सत्तारूढ झालेल्या भाजप-शिवसेना सरकारकडून भिगवणकरांना दिलेली ही भेट आहे.या योजनेमुळे भिगवणचा पिण्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारकडून देशात हर घर हर जल ही महत्वाकांक्षी योजना राबविली जात आहे.या कार्यक्रमांतर्गत २९ कोटी ७५ लाख ३१ हजार खर्चाच्या या योजनेस शिवसेना भाजप सरकारने मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.यावेळी पराग जाधव,संजय देहाडे, सरपंच तानाजी वायसे, उपसरपंच शीतल शिंदे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *