महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असल्याच्या तक्रारी या तालुक्यातील अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी वारंवार करीत होते.जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत पाठपुरावाही केला जात होता.मात्र माण परिसरात अवैध वाळू अथवा मुरुम उपसा,वाहुतक होत नसल्याचे माणच्या महसूल विभागाकडून वरिष्ठाना सांगण्यात येत होते.आता तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनाचे आदेश निघाल्यानंतर वाळू उपशाकडे दुर्लक्ष करून वाळू चोरांना अभय देणे तहसीलदारांना भोवल्याची चर्चा माण तालुक्यात आहे.
शिरताव गावच्या हद्दीत असलेल्या ओढ्यातून मोठ्या
प्रमाणात अवैध रित्या हजारो ब्रास वाळू चोरून नेली जात असल्याची तक्रार उपसरपंच किरण शामराव खळवे यांनी वरिष्ठ पातळवीर केली होती व तहसीलदार येवले यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करावे अशीही त्यांची मागणी होती.सूर्यकांत येवले यांनी तहसीलदार म्हणून तालुक्याचा पदभार घेतल्यानंतर एकाही अनधिकृत खडी क्रशर अथवा वाळू चोरीविरोधात कारवाई केलेली नाही असाही आरोप
सातत्याने करण्यात येत होता.प्रातांधिकारी आणि
तहसीलदार येवले या दोघांनाही कारणे दाखवा नोटिस
बजावण्यात आली होती.मात्र,शुक्रवारी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना थेट निलंबित करण्यात आल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.