पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मॉडर्न एडुकेशन सोसायटी पुणे अंतर्गत नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यलयात BBA (रिटेल ऑपरेशन्स) हा तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम मिनिस्ट्री ऑफ एचआरडी,गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांचे मार्गदर्शनाने व अनुमतीने शैक्षणिक वर्ष २०१९-२० ला सुरु करण्यात आला.युजीसीच्या नियमावलीप्रमाणे या अभ्यासक्रमास विदयापीठ व महाराष्ट्र शासनाची मान्यता घेणे आवश्यक होते,तसे न करता सुरूकेलेल्या या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत होते.
तशी मान्यता सादर प्रकारचे अभ्यासक्रम सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठात चालू नसल्याने, २०१९ पासून
विदयापीठ मान्यता प्रलंबित होती.अखेर सावित्रिीबाई फुले पुणे विधापीठाच्या त्यावेळचे पदाधिकारी निबंधक डॉ पवार,डीन.डॉ चासकर,कुलगुरू,डॉ.करमलकर, संस्थेचे विश्वस्थ डॉ.हाके,डॉ.चांडक,डॉ.गणेशन,डॉ.समन, डॉ रणधीर यांनी चर्चतून विधार्थ्यांचे हित पाहून यातून मार्ग काढला.विद्यपीठाच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत समावेशन करून मान्यता देण्याची प्रक्रिया विद्यमान प्रभारी कुलगुरू डॉ काळे व पदाधिकारी डॉ काळकर,डॉ.पांडे,डॉ.पालकर यांचे मार्गदर्शत पूर्ण करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून सेक्रेटरी नेस वाडिया व डॉ बोधनवाला यांनी प्रक्रियेला मार्गदर्शन केले.या अभ्यासक्रमास रिटेल असोसिएशन स्किल कौन्सिल ऑफ इंडिया आरएएससीआय व मॅकडोनाल्ड , ट्रेनिंग इंडस्ट्री पार्टनर याचे संयुक्त विद्यमाने राबवला जातो. याचे सविस्तर माहिती प्रभारी प्राचार्य डॉ रणधीर व या अभ्यासक्रमाचे समन्वय डॉ.वायाळ यांनी दिली. २०१९ साली प्रवेश घेतलेल्या विद्यर्थ्यनी व त्याचे पालकांनी अडचण यातून सुटली.