पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
महिला पोलीस शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले.तिला वारंवार मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तिचे अर्धनग्न फोटो काढून मित्रांना दाखवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडक पोलिसांनी एका पोलीस शिपायाला अटक केली आहे. संदीप कुंडलिक जाधव असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.सध्या तो पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे.हा प्रकार नोव्हेबर २०२० पासून सुरु होता.याबाबत एका महिला पोलीस अंमलदाराने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकत्र काम करीत असताना आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले.इतर मुलींशी अनैतिक संबंध ठेवून फिर्यादी यांच्यासोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली.त्यांना वारंवार मारहाण करुन मारुन टाकण्याची धमकी दिली.त्यांचे अर्धनग्न फोटो काढून ते मित्रांना दाखवून बदनामी केली.हे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली असून पोलिसांनी संदीप जाधव याला अटक केली आहे.या गुन्ह्याचा पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.