INDAPUR NEWS : छत्रपती शिवरायांचा इतिहास आत्मसात केल्यास आपली ध्येय प्राप्ती होईल -डॉ. प्रकाश पांढरमिसे


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त डॉ. प्रकाश पांढरेमिसे यांचे’ छत्रपती शिवराय आणि आजची तरुणाई विषयावर शाहीर अमर शेख सभागृहामध्ये व्याख्यानाचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी वरील मत व्यक्त केले.डॉ.प्रकाश पांढरमिसे म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी आपल्या कर्तुत्वाने जगाला ओळख दाखवून दिली. सर्व रयतेसाठी स्वराज्य स्थापन केले. युवकांनी गडकोट,गडकिल्ल्यांचा इतिहास आत्मसात केल्यास त्यातून आपल्याला प्रेरणा मिळून आपली ध्येय प्राप्ती होईल.अध्यक्ष मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी इंदापूर तालुका हा शैक्षणिक हब तयार व्हावा हा माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा संकल्प आहे.

विद्यार्थ्यांना फळे तसेच पेन वाटप,वृक्षारोपण,व्याख्यान व रांगोळी स्पर्धेसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे.डॉ.भिमाजी भोर,डॉ.सदाशिव उंबरदंड यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शिवाजी वीर यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख डॉ. राजेंद्र साळुंखे यांनी करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तानाजी कसबे यांनी केले.आभार उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *