BARAMATI NEWS : झारगडवाडीत प्रथमच दहीहंडीचा उत्सव ; दहीहंडीला झारगडवाडी व पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

गोकुळाष्टमी निमित्त झारगडवाडीत ( बारामती ) दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गोल्डन गर्ल सुवर्णा काळे, आणि रानबाजार फेम माधुरी पवार या सिनेतारकाच्या नृत्यावर तरूणाई अक्षरशः बेधुंद होत थरकली. झारगडवाडीत प्रथमच दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला होता यात पार्थदादा युथ फाउंडेशन ची ५५ हजार ५५५ रुपयांची दहीहंडी अभिनव दहीहंडी संघाने फोडली तर जनहित युवा प्रतिष्ठानची ५१ हजारांची हंडी जय मल्हार दहीहंडी संघाने फोडली. यावेळी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले.

यावेळी दहीहंडी उत्सवाला बारामती ऍग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार, बा. न. पालिकेचे जेष्ठ संचालक किरण गुजर, बा. ता. अध्यक्ष संभाजी होळकर, सोलापूरचे उपमुख्याधिकारी माणिकराव बिचकुले, परिवहन अधिकारी हेमंत सोलणकर, सिद्धार्थ राजेकंग, मा. का. संचालक योगेश जगताप, बा.संजय गांधी योजनेचे माझी अध्यक्ष किरण तावरे,पार्थदादा युथ फाउंडेशन चे दहीहंडी संघाचे मार्गदर्शक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत गावडे,पं.स.सदस्य राहुल झारगड, छ.कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, झारगडवाडीच्या सरपंच वैशाली मासाळ, झा.तंटामुक्ती अध्यक्ष गोरख बोरकर, ग्रा. सदस्य अजित बुरुंगले, वैष्णव बळी, पदमनाथ निकम, नितीन शेडगे, माझी सदस्य पोपट कुलाळ, युवा नेते प्रवीण बोरकर, अंकुश निकम, रमेश बोरकर, गोपीनाथ बोरकर, संतोष मासाळ, सतीश कुलाळ ( मेजर ), आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यामध्ये सर्वात मोठ्या दहीहंड्या ह्या मुंबई, पुणे, सारख्या या शहरांमध्ये पार पडत असतात. राज्यात तीन दिवसापूर्वी दहीहंडीचा थरार पार पडला. मात्र आता शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील आता गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. बारामती तालुक्यातील झारगडवाडीत प्रथमच मोठ्या उत्साहात दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला या दहीहंडी निमित्त सिनेतारकांच्या नृत्यावर तरुणाई अक्षरशा बेधुंद थरकली, सिनेतारकांचा जलवा आणि गोविदाकडून फोडण्यात येणारी दहीहंडी पाहण्यासाठी झारगडवाडी व पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रथमच ग्रामीण भागातल्या झारगडवाडीत दहीहंडी उत्सव साजरा झाल्याने महिलांना दहीहंडीचा उत्सव पाहता आला. यामुळे विशेष करून महिलांनी दहीहंडी आयोजकांचे आभार मानले.पार्थदादा युथ फाऊंडेशनचे आयोजन बंटी बोरकर, रणजित बिचकुले, अक्षय आवटे, प्रमोद बोरकर यांनी तर जनहित युवा प्रतिष्ठानचे आयोजन झारगडवाडीचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बोरकर, अभिजित झारगड, सुनील लोखंडे, मयूर निकम यांनी केले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *