BARAMATI NEWS : बारामती शहरातील कॅनॉलच्या अस्तरीकरणाच्या बाजूला संरक्षण कठडे अथवा जाळी बसवा ; अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रशासनाला जनआंदोलन उभारण्याचा ईशारा..!!


शहरातील कॅनॉलचे अस्तरीकरण हे ठेकेदारांना जगविण्यासाठी : संदीप चोपडे

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहरातील कॅनॉलवर झालेल्या अस्तरीकरणामुळे शहरातील अशोकनगर,देसाई इस्टेट,पुर्वा कॉर्नर,या भागातील बोअरचे पाणी गेले असून,या अस्तरीकरणामुळे कित्येक लोकांना जीव गमवावा लागला आहे व लागणार आहे.त्यामुळे हे अस्तरीकरण तात्काळ थांबवून अस्तरेकरणाच्या कडेला तात्काळ संरक्षक जाळी अथवा कठडे बसवण्यात यावे अशी मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालयात देण्यात आले.जर प्रशासनाने याचा लवकरात लवकर विचार केला नाही तर मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी दिला आहे.

बारामती शहरामधील कॅनॉलवर झालेले अस्तरीकरण हे बारामतीकरांच्या मुळावर उठलेले आहे.या अस्तरीकरणामुळे शहरातील अनेक भागातील बोअरचे पाणी गेले आहे.तसेच या अस्तरीकरणामुळे कित्येक लोकांना जीव गमवावा लागला आहे व लागणार आहे.दर पंधरा ते वीस दिवसात अशा घटना घडत आहेत.हे अस्तरीकरण हे फक्त ठेकेदार व ठेकेदारांना जगविण्यासाठी केले असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी केला आहे.या चुकीच्या अस्तरीकरणामुळे जर कोणी पाण्यात पडले तर बाहेर पडण्यास कोणताही पर्याय सापडत नाही.त्यामुळे कित्येक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

बारामती शहरातील कॅनॉल केले इंग्रजांनी,पावसाच
पाणी पाणी धरणात साठवून नंतर कॅनॉलद्वारे लोकांना मिळावे अशी व्यवस्था केली होती.मात्र नंतरच्या काळात सत्ताधाऱ्यांनी त्याच सुदधा वाटोळे केल आहे.त्यामुळे
कॅनॉलवर सुरू असलेले अस्तरीकरणाचे काम तात्काळ
बंद करावे.आणि त्याच अस्तरीकरणाचा पैसा तालुक्यातील २४ गावांच्या पाणी प्रश्नांसाठी वापरावा कारण,अनेक गावे पाण्यापासुन वंचित आहेत.त्यामुळे सोमेश्वरमधुन नदीचे कॅनॉलचे पाणी त्या २४ गावांना पाणी दयावे.अशा मागणी देखील निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.त्यामुळे या गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रशासनाने तात्काळ झालेल्या अस्तरीकरणाच्या कडेला संरक्षण कठडे बसवावेत आणि अस्तरीकरण तात्काळ थांबवावे अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारण्याचा ईशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *