BIG BREAKING : भिगवण प्राथमिक शाळेतील त्या नराधम शिक्षकावर दुसरा पोस्को गुन्हा दाखल ; या प्रकरणात केंद्रप्रमुख देवकाते सक्तीच्या रजेवर..!!


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने सहावीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करुन गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.या घटनेनंतर भिगवण पोलिसांनी त्या नराधम शिक्षकावर बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.यानंतर मात्र,या प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली होती.यानंतर आता संशयित आरोपी दादासाहेब अंकुश खरात,वय.४२ वर्षे ( रा. आरटीओ ऑफिसच्या मागे कल्याणीनगर,बारामती ) याच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३५४ सह ,बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे कलम २०१२ नुसार दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिगवण येथील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती.या समितीने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार संबंधित शिक्षक दोषी आढळून आला होता. मात्र या प्रकरणानंतर दादासाहेब खरात याने अनेक मुलींशी गैरवर्तन केल्याच्या घटना समोर येऊ लागल्या असून, त्यामुळे या नराधम शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या मुख्यध्यापिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून,केंद्रप्रमुखाला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

याप्रकरणी संबंधित सातवीतील अल्पवयीन मुलीला चावी देण्याच्या पाहण्याने जवळ ओढून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचे दुसऱ्या फिर्यादीत म्हटले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे.या घटनेचा अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *