बारामती शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहरातील गुणवडी गावातून एकाच कुटुंबातील पाच मुले गायब असल्याबाबत नातेवाईकांनी पोलिसांना कळवले असल्याने,शहर पोलिसांनी गायब असलेल्या राधिका प्रकाश साठे वय.१३ वर्षे,प्रज्योत प्रकाश साठे वय.११ वर्षे,प्रतीक्षा कल्याण कुचेकर,वय.१४ वर्षे,साक्षी कल्याण कुचेकर,वय.१३ वर्षे, मानसी कल्याण कुचेकर, वय.११ वर्षे अशा चार मुली व एक मुलाचा शोध घेणे सुरू केले. गुणवडी गावात सुद्धा लहान मुलांना पकडणारी टोळी आलेली आहे अशा अफवा पसरू लागल्याने पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ शोध घेण्यास सांगितले.
पोलिसांनी ग्रामस्थांच्या,पोलीस पाटलाच्या मदतीने तपास सुरू केला असता मेखळी या ठिकाणी एका दुकानदाराने ती पाच मुले पाहिल्याचे सांगितले व ती वालचंदनगरचा रस्ता विचारत असल्याचे सांगितल्याने, पोलिसांनी वालचंदनगरच्या तपस सुरू केला असता, सायंकाळी सातच्या दरम्यान जंक्शन या ठिकाणी दोन मुली मिळून आल्या त्यांनी सांगितले की त्यांना गाडीत घालून त्यांना मामाकडे भेटायला घेऊन जात आहे असे सांगून गाडीत बसवले व त्यांना वालचंद नगरच्या दिशेने घेऊन आले व त्यांना त्याठिकाणी सोडले.अशी कहाणी सांगितली.काही वेळातच त्या भागात आणखी दोन मुली मिळून आल्या.पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतले असता, त्यांचे कोणीही अपहरण केले नसून,मामाच्या रागावण्यामुळे मुलांनी हा बनाव केला असल्याचे कबूल केले.
यातील मुलाने घरीच चीठी सुद्धा लिहून ठेवलेली होती की, त्यांचा शोध घेऊ नका ते मोठे बनूनच घरी येतील. पोलिसांनी जर कौशल्याने आणि तत्परतेने तपास केला नसता तर घटनेचे गांभीर्य खूप मोठे होऊ शकले असते मुलांनी काहीतरी वेगळा विचार करून घरी न जाण्याचा निर्णय करून घरातून बाहेर पडले असल्याने वेगळ्या मार्गाने गेले असते तर एखाद्या अपराधाची सुद्धा ती शिकार होऊ शकले असते.पोलिसांनी पालकांचे सुद्धा सामुपदेशन करून लहान मुलांना रागावून खडसावून कोणतीही गोष्ट करू नका त्यांना विचारात घेऊन समजूतदारपणे त्यांच्याशी वागा असा सल्ला देऊन सर्व मुले ही त्यांच्या आईच्या व मामाच्या ताब्यात देण्यात आली.
हा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस कर्मचारी तुषार चव्हाण,दशरथ कोळेकर,बंडू कोठे,कल्याण खांडेकर,अक्षय सीताप,शाहू राणे,यांच्या पथकाने केलेला आहे.