BIG NEWS : अवैध धंद्याविरोधात कामशेत पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय बेधडक मोर्चा ; पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या कार्यकाळातही अवैध धंदे बंद करण्यासाठी मोर्चा काढावे लागणे ही शोकांतिका जनसामान्यांची भावना..!!


अवैध धंद्याना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी…

कामशेत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावेत. संबंधितावर कडक कारवाई व्हावी, यासाठी कामशेत पोलीस स्टेशनवर ‘बेधडक मोर्चा’ आज काढण्यात आला. आम्हाला रक्षक हवा आहे,भक्षक नको.काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे तालुक्यात अवैध धंदे वाढत असून त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत आहे.त्यामुळे यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.मोर्चाच्या वेळी ग्रामीण भागातील आठ ते नऊ गावांमधून गावठी दारु पोलीस अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी आणली होती.

हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात याचे उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावे.अवैध धंदे तरुण पिढीला बिघडवण्याचे काम करत आहेत.सकाळी उठून व्यायाम करण्याऐवजी दारू कुठे मिळते ही शोधायची वेळ भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तरुणांवर आणली आहे.मागील दीड वर्षांपासून पोलीस प्रशासनाला सांगतोय गावागावात सुरू असलेले धंदे बंद करा.त्याकडे डोळेझाक केली जात आहे. पावसाळी अधिवेशनात देखील यावर आवाज उठवला आहे.अवघ्या वीस रुपयांची दारू तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त करत आहे.

याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा.एका तासात अवैध धंदे बंद करा, अन्यथा ही हातभट्टीची दारु अधिवेशनात नेऊन आवाज उठवण्यात येईल,असा इशारा यावेळी दिला.यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे,ॲड.रूपाली दाभाडे,राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे यांनी मनोगत व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मावळ,आजी माजी पदाधिकारी,महिला भगिनी,कार्यकर्ते व ग्रामस्थ या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *