BIG BREAKING : इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; एकजण ताब्यात तर दोघेजण फरार…!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा एका नराधम शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडून दोन दिवस होत नाही तोपर्यंत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची झाल्याची धक्कादायक घटना बेलवाडी येथे घडली आहे.वालचंदनगर पोलिसांनी तिघांविरोधात भा.द.वि.३७६ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून,पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक केली असून,दोघेजण फरार आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.राहुल हनुमंत जाधव ( रा. बेलवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आरोपी राहुल जाधव याने पीडितेला शेतात जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला.काही वेळाने ओमिनी या चारचाकीमधून आलेल्या त्याच्या दोघांपैकी एकाने पीडितेवर जबरदस्ती केली.या दोघांनीही चेहऱ्यावर रुमाल बांधला होता.त्यानंतर आरोपींनी पीडीतेस ओमिनी गाडीतून इंदापूर बारामती रोडवर असलेल्या एका घरात घेऊन गेले.थोड्या वेळाने त्याच गाडीतून आरोपींनी तिला बेलवाडी बस स्थानकावर सोडले.

दरम्यान,विशेष म्हणजे या घटनेतील मुख्य संशयित आरोपी असलेल्या राहुल जाधव याने सायंकाळी ४ वा. सुमारास चारचाकी गाडीतून पीडितेच्या घरासमोर येऊन पीडितेच्या आईला जातीवाचक शिवीगाळ व हाताने मारहाण केली. या तिघा नराधमांपैकी मुख्य आरोपी असलेल्या राहुल जाधव याला पोलिसांनी अटक केली असून,या गुन्ह्याचा पुढील तपास बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *