बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार (दि.२०) रोजी अंनिस,बारामती शाखेच्या वतीने मॉर्निंग वॉक व अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ७:०० वाजता हुतात्मा स्तंभ,भिगवण चौक येथे डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मॉर्निंग वॉकला सुरूवात झाली.
इंदापूर चौक, गुणवडी चौक, गांधी चौक मार्गे भिगवण चौक येथे रॅलीची सांगता झाली.रॅलीमध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेले सामाजिक संदेश असणारे फलक चर्चेचा विषय ठरले.या रॅलीमध्ये अंनिसचे बारामती शाखेचे अध्यक्ष डॉ.डि.व्ही.सरवदे, सचिव तुकाराम कांबळे, कार्याध्यक्ष विपुल पाटील, कृष्णा पगारे,रंगनाथ नेवसे, बाळकृष्ण भापकर, राहुल केदारी, महेंद्र गायकवाड, प्रा. प्रभाकर पाटील, महामुनी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला.