CRIME NEWS : भाजीपाल्याच्या कॅरेटच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; यवत पोलिसांनी साडे नऊ लाखांचा गुटख्याचा मुद्देमाल केला जप्त..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

सुपे ते भांडगाव मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या पुण्याकडे गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकाला यवत पोलिसांनी ताब्यात घेतले असून,अमित अंकुश कदम ( रा.लांडगेवाडी,ता. कवठेमहांकाळ,जि.पुणे ) व एका जणांवर यवत पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम २७२, २७३,३२८ (३४),अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२), २६ (२) (a),२७ (१), २७ (३), ३० (२),५९ नुसार विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सागर दशरथ क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,यवत पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमित कदम व एकजण पिकअप गाडीमध्ये अवैधरित्या गुटखा सुपे ते भांडगाव रोडने पुण्याकडे जाणार असल्याची माहिती मिळाली असता,यवत पोलीस तात्काळ भांडगाव येथुन खोरकडे जात असताना एक पिकअप संशयितरित्या जाताना निदर्शनास आल्याने पिकअपचा पाठलाग करत वाहन थांबवून चौकशी करताना गाडीतील दोघेजण पळुन जाताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता,गाडीत भाजी पाल्याचे कॅरेट लावलेले दिसले,व त्याच्या आत मध्ये त्याचे आतमध्ये बारदाणा पोती दिसली.त्यामधुन गुटखा आढळून आला.गाडीत

विमल पान मसाला सुपारीची १० पोती अंदाजे ३,५२,०००, विमल पान मसालाची ०३ पोती अंदाजे ६६,०००,विमल पान मसालाच्या लहान बॅगा ९६,००० व महिंद्रा कंपनीची पिक अप गाडी क्र.एम.एच.४२.एम. ९५८१ असा तब्बल ९,६४,००० असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस हवालदार गोसावी,चालक शिंदे यांच्या पथकाने केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *