BARAMATI CRIME : सोशल मीडियामध्ये प्रसिध्द होण्याच्या हौसेसाठी व श्रीरामनगरमध्ये दबदबा निर्माण करण्याच्या हेतूने खून केल्याची पोलीस तपासातून माहिती समोर..!!


तीन अल्पवयीन आरोपींना शहर पोलिसांनी केले अटक..!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

श्रीरामनगर मधील कवी मोरोपंत शाळेजवळ काल शशिकांत बाबासो कारंडे,वय.४७ वर्षे यांची तीन अनोळखी युवकांनी धारदार शस्त्रानी मानेवर डोक्यावर वार करून निर्घृणपणे हत्या केली होती.याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम ३०२,(३४),भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल असून,या गुन्ह्यात शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.या विधीसंघर्षग्रस्त मुलांनी शशिकांत कारंडे यांचा खून केल्याचे कबूल केले आहे.

यातील विधी संघर्षग्रस्त बालक याचा मयताच्या मुलाशी एका मुलीच्या मैत्रीवरून वाद झाला होता त्यावेळी सुद्धा त्याने फिर्यादी यांच्या मुलावर हल्ला केला होता.त्यावेळेस संशयित आरोपीने व त्याच्या दुसऱ्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले व बाल न्यायालयापुढे हजर केले होते.संशयित आरोपीच्या पालकांनी त्याला सोडवुन आणले होते.यातील मयताचा मुलगा व तिन्ही अपचारी बालक एकाच शाळेत पूर्वी शिकलेली व पूर्वी एकमेकांचे दोस्त होते.परंतु मुलींच्या मैत्रीवरून त्यांच्यात वाद झाला यातील मयताचा मुलगा यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.व त्याच्या मैत्रिणीच्या प्रेमामध्ये अडथळा निर्माण करतो असा गैरसमज त्यांनी करून घेतला.

त्याला मयत हे सुद्धा पाठीशी घालत आहेत असाही गैरसमज करून घेतला.यातील मैदानी सुद्धा वडील कीच्या नात्याने त्यांना भांडण न करण्याबाबत एक दोन वेळा समजवले होते याचाही राग त्यांना होता.सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध होण्याची त्यांना हौस होती व श्रीराम नगर भागात त्यांचा वचक व्हावा असे कृत्य करावे व भविष्यात त्या ठिकाणी दबदबा निर्माण करावा असे सुद्धा एकंदरीत त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरून दिसून येते याच कारणास्तव त्यांनी शशिकांत कारंडे यांचा भर वस्तीत भर दिवसा खून केला असल्याचे निष्पन्न होत आहे असे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहा.पोलीस निरीक्षक उमेश दंडिले,सहा.प्रकाश वाघमारे पोलीस उपनिरीक्षक पाटील,घोडके पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर,तुषार चव्हाण,बंडू कोठे यांनी तात्काळ विधी संघर्षग्रस्त बालकांचा वेगवेगळ्या टीम तयार करून शोध घेऊन ताब्यात घेतले आहे.

बातमी चौकट :

सर्व संशयित आरोपींच्या सोशल मीडियाची सखोल तपासणी सुरू आहे.या सर्व आरोपींवर रेगुलर कोर्टामध्ये खटला चालून शिक्षा होण्याबाबत पोलिसातर्फे पाठपुरावा केला जाणार आहे. सर्व पालकांना तसेच शिक्षकांना विनंती करण्यात येत आहे की अल्पवयीन मुलांचे सोशल मीडिया मॉनिटरिंग आपण सर्वांनी मिळून करायला आवश्यक आहे.अल्पवयीन मुला-मुलींचे इंस्टाग्राम फेसबुक व्हाट्सअप हे सर्व पालकांनी वेळोवेळी त्यांना विश्वासात घेऊन तपासणी करणे गरजेचे आहे.तसेच ज्या अल्पवयीन मुलांची कौटुंबिक वातावरण चांगले नाही अशा. मुलावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. पोलीस सुद्धा आता या बाबत सोशल मीडिया मॉनिटरिंग करणार आहेत.

सुनील महाडिक ( बारामती शहर पोलीस निरीक्षक )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *