BIG BREAKING : दौंड तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! पोलीस कर्मचाऱ्याला ऑन ड्यूटी दारू पिऊन गोंधळ घालणे पडले महागात ; गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) एका पोलिस नाईकाविरूध्द ऑन ड्यूटी मद्यपान करून गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. एसआरपीएफ गट क्रमांक सात मधील पोलिस नाईक सोमनाथ पंढरीनाथ रायकर ( रा. ५६५ क्वॅार्टर, एसआरपीएफ गट क्रमांक सात, दौंड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यपान करून सकाळी सव्वासात वाजता मैदानावर येऊन त्याने गोंधळ घातला होता. गटाचे समादेशक वसंत परदेशी यांनी ही बाब गंभीरतेने घेत कारवाईचे निर्देश दिले.दौंड पोलिस ठाण्यात एसआरपीएफचे फौजदार वैभव टेकवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमनाथ रायकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसआरपीएफ गट क्रमांक पाच व सात मध्ये ऑन ड्यूटी मद्यपानाचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. परंतु संबंधित मद्यपींची नोकरी आणि त्यांच्या कुटुंबाचे हित विचारात घेऊन वेळोवेळी समज देऊन कारवाई टाळली जात होती. मात्र त्याचा गैरफायदा घेत मद्यपी पोलिस अंमलदारांकडून ऑन ड्यूटी मद्यपान करण्याचे प्रमाण वाढून सर्रासपणे शिस्तभंग केली जात असल्याने संबंधितांवर प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *