BIG BREAKING : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या बारामतीतील शिक्षिकावर अखेर विनयभंगासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल..!!


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील जिल्हा प्राथमीक शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली असून,या शाळेतील नराधम शिक्षक दादासाहेब अंकुश खरात,वय.४२ वर्षे (रा.कल्याणी नगर,आरटीओ ऑफिस जवळ, बारामती ) याने सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केले असून,याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिक्षक दादासाहेब खरात याला अटक करून त्याच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात भा.द. वि.कलम ३५४,३५४(ड),५०६ सह बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,भिगवणमधील जिल्हा परिषदेच्या
प्राथमिक शाळेत बारामती तालुक्यातील हा पदवीधर शिक्षक आहे.सध्या इयत्ता सहावीच्या वर्गावर वर्गाक्षिक म्हणून कार्यरत असून,त्याच्या वर्तणुकीचे प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला खालचे वर्ग देण्यात आले होते,मात्र त्याने पुन्हा वरचा म्हणजे सहावीचा वर्ग मागुन घेतला होता,अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे.दरम्यान बुधवारी १७ ऑगस्ट रोजी त्याने त्याच्या सहावीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीशी वर्गातच अश्लील चाळे करत तू घरी राहत जाऊ नकोस,मला करमत नाही.

“त्यामुळे तू हे कोणाला सांगू नकोस,नाहीतर मी तुला बघुन घेईन असा दम पीडित अलवयीन मुलीला दिला.तू माझ्याजवळ बसायचे.असे पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करायचा.ही गोष्ट मुलीने घरी सांगितल्याने या प्रकाराला वाचा फुटली असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.पुणे जिल्ह्यासह परिसराला हादरून सोडणाऱ्या या घटनेतील नराधम शिक्षकाला मुख्याध्यापिका आणि गट विकास अधिकारी यांनी पाठीशी घालत असल्याच्या देखील जोरदार चर्चा सुरू असून,यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे एप्रिल २०२२ मध्ये असाच एक प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित शाळेने त्याच्यावर कडक कारवाई करण्याऐवजी त्याच्याकडून माफीनामा लिहून घेत प्रकरणावर पडदा टाकला.

एवढे घृणास्पद प्रकार या नराधमाकडून सातत्याने होत असतानाही वारंवार गटशिक्षणाधिकारी व जिल्हा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका का पाठीशी घालत आहेत ? याबाबत देखील सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता भिगवण परिसरातील नागरिकांकडून होत असून,या प्रकरणात नराधम शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील फौजदारी कारवाई कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.त्यामुळे आता भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी कर्तव्यदक्ष अधिकारी दिलीप पवार याकडे लक्ष देऊन नराधम शिक्षकाला एवढ्या दिवस पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का ? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *