BIG BREAKING : बारामतीमध्ये भरदिवसा कोयत्याने वार करत एकाचा खून ; प्रेम प्रकरणातून खून केल्याचा संशय..?


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती-भिगवण रोडवरील श्रीरामनगर मध्ये भरदिवसा कविवर्य मोरोपंत शाळेजवळ एकावर कोयत्याने वार करून त्याचा निर्घुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शशिकांत कारंडे,वय.५० वर्षे (रा. श्रीरामनगर,बारामती,जि.पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.गुरुवारी दुपारी ६.०० च्या सुमारास ही घटना घडली असून,प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिसांनी तातडीने शोध सुरु केला आहे. कारंडे हे त्यांच्या नातवाला नेण्यासाठी कविवर्य मोरोपंत शाळेत आले होते. याच दरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर येत आहे.या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, बारामती शहरात काही दिवसांपूर्वी प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला झाला होता.त्याच प्रकरणातून आजचा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *