BARAMATI NEWS : देशाच्या अमृतमहोत्सवाचे व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सिद्धीविनायक फाउंडेशन व कसबा क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

देशाच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व बारामतीचे सुपुत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमीत्त सिद्धीविनायक फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश जोजारे व कसबा क्रिकेट क्लबचे सुरज
ओवाळ यांच्या वतीने बारामती येथे तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेच आयोजन केले होते.तालुक्यांतील ग्रामीण भागासह बारामती शहरातील म.ए.सो.हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान,विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर, टेक्नीकल हायस्कूल,शाहू हायस्कूल,धों.आ.सातव हायस्कूल,शारदानगर,एकता इंग्लिश स्कूल,जि.प.शाळा ढवाणवस्ती व सर्व नगरपरिषद शाळांनी यांत सहभाग नोंदवला.

विविध भागातून आलेल्या १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी चार गटामध्ये परिक्षा देत सिद्धिविनायक फाउंडेशन च्या या उपक्रमाला प्रत्येक कार्याक्रमा प्रमाणे यावेळी देखील उस्फूर्त पणे प्रतिसाद दिला.यास्पर्धेत तब्बल २००० पेक्षाही अधिक विद्यार्थांनी आपला सहभाग नोंदवला.आज पर्यंतचा बारामती तालुक्यातील सगळ्यात मोठा तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा कार्यक्रम अक्षदा मंगल कार्यालयामध्ये पार पडला.

या कार्यक्रमासाठी व सर्व लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बारामती नगरीच्या नगर सेविका सई सातव, आरती सातव,बारामती सहकारी बँकेचे चेअरमन व माजी नगरसेवक सचिन सातव,बाळासाहेब चव्हाण दिलीप ढवाण,नारायण तुपे,दशरथ पवार तसेच बारामती व ग्रामीण भागातील सर्व शाळेतील शिक्षक वर्ग तसेच सिद्धिविनायक फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश जोजारे कसबा क्रिकेट क्लबचे सूरज ओवाळ,करिम तांबोळी, जमीर महत,प्रतिक जोजारे,रोहित साळुंखे व इतर सभासदांनी स्पर्धा पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले.यावेळी सिद्धिविनायक फाउंडेशन व कसबा क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *