BARAMATI NEWS : बारामती शहर पोलिसांकडून कॉलेज आवारात विनाकारण फिरणाऱ्या मुलांवर कारवाई..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहरामध्ये दुपारी सायंकाळी दोन शिफ्टमध्ये बरेच कॉलेज चालतात कॉलेज सुटण्याच्या वेळेस अनेक मुले विना नंबर प्लेट तसेच विनाकारण कॉलेज शाळा परिसरामध्ये मोटरसायकली घेऊन जोरात आवाज करून फिरत असतात.निर्भया पथक सुद्धा त्यावर सतत कारवाई करत असते परंतु आज एकाच वेळी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ पोलीस उपनिरीक्षक घोडके,पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे,पाटील यांच्या चार टीम तयार करून एकाच वेळी वेगवेगळ्या कॉलेजवर पाठवल्या टीसी कॉलेज आणि अनेकांत शाळा राधेश्याम शाळा रमाकांत शाळा शाहू हायस्कूल सातव कॉलेज या ठिकाणी पोलिसांनी सध्या कपड्यात जाऊन दुपारी तीन वाजता दबा धरून बसून कॉलेज सुटण्याच्या वेळेस मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे.

सर्व शिक्षक पालक यांना सुद्धा याबाबत अवगत केले आलेले आहे.अनेक मुलांकडे आई-वडिलांनी घेऊन दिलेल्या स्वयंचलित स्पोर्ट बाईक आहेत आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाच्या ताब्यात गाडी घेताना त्याच्याकडे लायसन्स आहे का त्याचं वय आहे का हे पाहिले पाहिजे आज पालकांच्या वर सुद्धा वाहतुकीचा दंड टाकण्यात येणार आहे. विना नंबर चालकास गाडी चालवायला देणे हे मालकाला पाच हजार रुपये दंड होतो


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *