BIG NEWS : बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने केली तब्बल १४ लाखांची फसवणूक..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून १३ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ८ एप्रिल ते ३ मे या कालावधीत यमुनानगर निगडी येथे घडली आहे.याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत राकेश ईश्वरदास लोहार वय.३८ वर्षे (रा.यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना वेगवेगळ्या तीन मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला. आरोपींनी बिटकॉइन मध्ये गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवले.बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे फिर्यादी यांना सांगितले.आरोपीने फिर्यादी यांना व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवली या लिंकद्वारे फिर्यादी यांनी आपली वैयक्तिक माहिती भरत बायकॉईन हे अ‍ॅप डाऊनलोड केले.

या अ‍ॅपद्वारे फिर्यादी यांनी तब्बल १३ लाख ६७ हजार रुपये भरले.परंतु त्यांना कोणताच परतावा मिळाला नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली.पुढील तपास पोलीस अंमलदार विश्वजित खुळे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *