बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
नाझरे धरणाची जलाशय पातळी ६७६.९३ मी आणि एकूण पाणीसाठा २१.९६१ दलघमी (९८) टक्के इतका झाला असून नाझरे धरणात सध्या पाण्याचा येवा सुरू झाला आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावे तसेच नदीपात्रात कोणीही उतरू नये व नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत अशा सूचना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या आहेत.
पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या येव्याचा दर पाहता पूढील ६ ते ७ तासात प्रकल्पातील पाणीसाठा १०० टक्के होण्याचा अंदाज असून त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याच्या येव्या नुसार धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे नदीत विसर्ग सुरु होऊ शकतो.त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत.नदी किनाऱ्यावरील सखल भागातील नागरिकांना सूचना देऊन उचित कार्यवाही करण्यात यावी आशा सूचना देण्यात आले आहेत.कऱ्हा नदी बारामती तालुक्याची व शहराची जीवन वहिनी आहे. म्हणून विसर्ग सुरू झाल्यास पाणी येऊ शकते.अशी माहिती देखील धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.