बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती एमआयडीसी परिसरात रुईपाटी येथील महिलेला न सांगता घराबाहेर पडल्याने त्याचा राग मनात घरत नवऱ्याने बायकोवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सुदर्शन रणजित जाधव ( रा. बारामती एमआयडीसी,बयाजीनगर ) यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३२६,३२४,३२३,५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत २७ वर्षीय जखमी दिपाली सुदर्शन जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्यादी गेल्या दोन महिन्यापासून दिपाली जाधव यांच्या भाड्याच्या खोलीत राहत असून,२०११ साली फिर्यादीचा प्रेमविवाह झाला असून,त्यांना दोन मुले देखील आहेत.फिर्यादींचे पती हे बारामती एमआयडीसी येथे मजुरी काम करत असून,दि.१०/८/२०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता फिर्यादी पेन्सिल चौकात कामानिमित्त गेले असता, सायंकाळी ६.३० वाजता फोन करीत तू कुठे आहेस,मुली कुठे आहेत अशी चौकशी केली असता,कामानिमित्त सुभद्रा मॉल येथे आली असून,मुली घरीच आहेत असे सांगितले.
सायंकाळी ७.५० वाजता पीडिता घरी गेल्या त्यावेळी फिर्यादींच्या पतीने तु कोठे गेली होती,मला काही सांगितले का नाही असे म्हणत फिर्यादींना मारहाण करत घरातील कोयता घेत कोयत्याने जखमी वार करत, फिर्यादींच्या डाव्या हाताची करंगळी व एक बोट तुटले तसेच पोटरीवर मारहाण करत गंभीर जखमी केले. झालेल्या मारहाणीला घाबरून फिर्यादी ह्या घराच्या बाहेर पळून गेल्या व त्यांनी त्यांच्या ओळखीचे पप्पू दराडे यांना फोन करत बारामती येथील गावडे हस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.या घटनेचा अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत.